जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे प्राधान्याने लसिकरण करण्यात यावे

जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे प्राधान्याने लसिकरण करण्यात यावे

*कोकण  Express*

*जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे प्राधान्याने लसिकरण करण्यात यावे*

*कणकवली शिवसेना संपर्क प्रमुख शंकर पार्सेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*

*कणकवली (संजना हळदिवे)*

देशभरासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी अनेकजण फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत आहेत. यात डॉक्टर, नर्स, पोलिस अशा अनेकांचा समावेश आहे. त्या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. यांच्याप्रमाणेच पत्रकारही फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचेही प्राधान्याने लसिकरण करण्यात यावे, अशी मागणी कणकवली शिवसेना संपर्क प्रमुख शंकर पार्सेकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पत्रकार फ्रंटलाईन वर्कर प्रमाणे सतत अहोरात्र काम करत असतात. या कोरोनाच्या महामारीने देशभरासोबत महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांचा बळी घेतलाय. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचे अजूनही लसिकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकार जीव मुठीत धरून काम करत आहे. यासाठी त्यांच्या कामाची जाण ठेवून त्यांचे प्राधान्याने तालुकानिहाय लसिकरण करण्यात यावे, अशी मागणी शंकर पार्सेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!