पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे सडूरे प्राथ.आरोग्य केंद्राला मिळाली ऍब्युलन्स

पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे सडूरे प्राथ.आरोग्य केंद्राला मिळाली ऍब्युलन्स

*कोकण Express*

*पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे सडूरे प्राथ.आरोग्य केंद्राला मिळाली ऍब्युलन्स*

*शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोकेच्यां पाठपुराव्याला अखेर यश*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

गेली अनेक वर्षे सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहीका नसल्यामुळे सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत होती. वेळोवेळी मागणी करुन सुध्दा यापुर्वीच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीने या विषयासाठी पाठपुरावा केला नव्हता. गेली अनेक वर्षे या मतदारसंघातुन अनेक लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याची महत्त्वाची पदे उपभोगली परंतु जी जुनी रुग्णवाहीका होती तिच्या साध्या दुरुस्तीसाठी सुध्दा निधी आणु शकले नाहीत. म्हणुनच आपण या मतदारसंघाचा लोकप्रनिधी म्हणून प्रथम प्राधान्याने या आरोग्यकेंद्राला सुसज्ज रुग्णवाहीका मिळावी म्हणुन गेली दोन वर्ष सतत जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. परंतु निधी अभावी हे काम रखडले होते ते या कोवीड १९ च्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतुन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. उदय सामंत यांच्या सुचनेनुसार वैभववाडी तालुक्यातील सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्राला हि सुसज्ज रुग्णवाहीका देण्यात आली.

२९ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम, उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णवाहीकेचे लोकार्पण कण्यात आले.

लोरे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्या दिव्या पाचकुडे यांनी सुध्दा या रुग्णवाहीकेसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. सडुरे सारख्या ग्रामीण भागाला सुसज्ज रुग्णवाहीका देऊन येथील ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय दूर केल्याबद्दल पालकमंत्री नाम, उदय सामंत यांचे या मतदारसंघातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या वतीने मी जाहीर आभार व्यक्त करीत आहे.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!