*कोकण Express*
*चक्रीवादळा नंतर विज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी दिवस रात्र झटणार्या विध्यूत कर्मचार्यांचा सत्कार*
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्ता स्थापन करून सात वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून नाटळ सांगवे विभागीय कार्यालया मार्फत नाटळ – सांगवे-भिरवंडे दशक्रोशीतील कार्यरत विद्युत कर्मचारी व अधिकारी यांचा सत्कार माननीय जि प अध्यक्षा सौ संजना संदेश सावंत व माजी जि प अध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत यांच्या हस्ते कर्मचार्यांना रेनकोट चे वाटप करून करण्यात आला. तोक्ते चक्रीवादळात विध्यूत पोल पडल्यामुळे अनेक गावातील विध्यूत पुरवठा खंडीत झाला होता अशा परीस्थितीत विध्यूत कर्मचार्यानी केलेले काम खरोखर कौतुकाद्स्पद आहे सतत खंडीत होणार्या विजपूरवठ्या मुळे विध्यूत कर्मचारी नाहक टिकेचे धनी होत असतातपरंतू चांगल्या कामाचा गौरव हा झालाच पाहिजे असे मत जि प अध्यक्षा सौ संजना संदेश सावंत यांनी व्यक्त केले. आपण केलेल्या कामाची दखल घेण्यात आली याबद्दल आनंद वाटतो असे कौतूक नेहमी काम करण्यास प्रोस्साहन देते असे मत विध्यूत कर्मचार्यानी व्यक्त केले तसेच वादळात नुकसान झालेल्या नागरिकांना या प्रसंगी पत्रे व ताडपत्री वाटप करण्यात आले या कार्यक्रमास सांगवे सरपंच मयुरी मुंज, दारीस्ते सरपंच संजय सावंत भाजप कार्यकर्ते प्रफुल काणेकर, नाना जाधव , राजू सापळे, हनुमंत सावंत अशोक काबंळे, पप्या गावकर, बाळी सावंत ए्मअेसीबी कनिष्ठ अभियंता शिकवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.