*कोकण Express*
*नरेंद्र मोदींची सप्तपुर्ती*
*कणकवली भाजपाने उपजिल्हा रुग्णालय केले सॅनिटायज*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या सप्तवर्षपूर्ती निमित्त कणकवली तालुका भाजप च्या वतीने उपजजिल्हा रुग्णालय कणकवली येथे हॉस्पिटल इमारत व परिसर सॅनिटायज करण्यात आला. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात.कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कोरोना चा प्रसार होऊ नये म्हणून उपजिल्हा रुग्णालय व परिसर सॅनिटायज करण्यात आला. यावेळी जि.प.अध्यक्षा संजना सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे,तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री ,पं स सभापती मनोज रावराणे, नगरसेविका मेघा गांगण,युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, नगरसेवक शिशीर परुळेकर, पं स सदस्य महेश लाड,नगरसेवक विराज भोसले,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पपू पुजारे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर,सर्वेश दळवी,विजय इंगळे,सचिन पराधिये,समर्थ राणे,अजय घाडीगांवकर,बाळा पाटील उपस्थित होते.