*कोकण Express*
*भाजपाच्या सप्त वर्ष पूर्ती निमित्त संजना सावंत अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी राबविले उपक्रम*
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेहमी लोकाभिमुख उपक्रम होत असतात. मा. श्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केंद्रात सत्ता स्थापन करून ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या सप्तवर्षपूर्ती निमित्ताने नाटळ सांगवे विभागीय कार्यालया मार्फत नाटळ – सांगवे-भिरवंडे दशक्रोशीतील कार्यरत विद्युत कर्मचारी व अधिकारी यांचा सत्कार रविवार दिनांक ३० मे रोजी विद्युत कार्यालय सांगवे , कनेडी येथे मा सौ संजना संदेश सावंत (जि प अध्यक्षा सिंधुदुर्ग ) आणि मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत (माजी जि प अध्यक्ष ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन पावसाळ्यात विद्युत वाहिनी चे काम करताना सुकर व्हावे म्हणून रेनकोट चे वाटप करण्यात आले.
वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून येणारी मदत तुटपुंजी व वेळ काढू असल्याने या भागातील लोकांच्या घरावरील पत्रे गेल्याने पावसाळ्यामुळे त्या लोकांचे हाल होऊ नये याकरिता तातडीने पत्र्याचे वाटप करण्यात आले. तसेच आगाऊ शेतीचा हंगाम विचारात घेऊन शेतकऱ्यांना भात पिकाच्या अनुषंगाने लागणाऱ्या ताडपत्री देखील या भागात विनामूल्य उपलब्ध करून दिल्या.
ह्या सप्त वर्षपूर्ती कार्यक्रमास सांगवे सरपंच मयुरी मुंज, दा रिस्ता सरपंच संजय सावंत, भाजपा कार्यकर्ते प्रफुल्ल कानेकर, नाना जाधव, राजू सापळे, हनुमंत सावंत, अशोक कांबळे, पप्या गावकर, बाळी सावंत एमसिबी कनिष्ठ अभियंता शिवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.