दत्ता सामंतांची पदरमोड, आमदारांनी काय केले ते सांगा ! : गणेश कुशे नगरसेवक गटनेता मालवण नगरपरिषद

दत्ता सामंतांची पदरमोड, आमदारांनी काय केले ते सांगा ! : गणेश कुशे नगरसेवक गटनेता मालवण नगरपरिषद

*कोकण Express*

*दत्ता सामंतांची पदरमोड, आमदारांनी काय केले ते सांगा ! : गणेश कुशे नगरसेवक गटनेता मालवण नगरपरिषद*

*आमदार ताडपत्रीचा धंदा करतात अशी टीका केणी यांनीच दोन वर्षांपूर्वी केली होती.त्याच धंद्यात छोटस कंत्राट घ्यावे आता*

कोरोनाचा कहर आणि त्योक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, भाजप चिटणीस माजी खा. निलेश राणे, मा. दत्ता सामंत आणि भाजपचे सर्वच स्तरातील पदाधिकारी मालवण शहर आणि तालुकावासीयांना दिलासा देण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर शिवसेनेच्या फुकटखाऊ पदाधिकाऱ्यांचा तोल सुटला आहे. स्वतः काही करायचे नाही, वरिष्ठांना खुश करण्यासाठी पेपरात स्टंटबाजी करायची, असा उद्योग शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केला आहे.

;गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी कोरोनाबाधितांना दिलासा देण्यासाठी कंबर कसली आहे. सामंत यांनी प्रशासनाच्या त्रुटी दाखवून दिल्या, त्याचा पोटशूळ सेनेच्या पदाधिकाऱ्यांना उठलेला दिसतो. मालवणचे बांधकाम सभापती आणि नवेकोरे शिवसैनिक मंदार केणी यांचा तोल जास्तीच सुटला आहे. दत्ता सामंत हे स्वखर्चातून नागरिकांना दिलासा देत आहेत. पण कंत्राटसम्राट आमदारांनी स्वतःच्या खिशातून किती पैसे खर्च केले, याचा हिशोब केणी यांनी मालवणवासीयांना सांगावा. दत्ता सामंतांच्या पैशावर नगरसेवक आज सामंतांनाच शिकवत आहेत, यासारखा दुसरा विनोद नाही.

महेश कांदळगावकर हे मालवणचे नगराध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून मालवण शहरवासीयांना कोणता दिलासा मिळाला, याचा पाढा उपनगराध्यक्षांनीच वाचला आहे. मालवण नगरपरिषदेने कोव्हीड वरील उपचारांसाठी काय तरतूद केली ? आमदारांनी घोषणा केलेले कोव्हीड हेल्थ सेंटर सुरु करण्यासाठी दोन महिने का लागले ? पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यात ऑक्सिजन बेड असलेले शासकीय रुग्णालय नाही, हे आमदारांचे अपयश की दत्ता सामंत यांचे ? मालवणवासियांची ऑक्सिजन अभावी परवड होत असताना आमदार कसल्या बेरजा आणि वजाबाक्या करीत होते ? दत्ता सामंत स्वतः स्वखर्चातून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देत होते, तेव्हा आमदारांची फॉर्च्युनर कुठे फिरत होती ? हे केणी यांनी मालवणवासीयांना समजून सांगावे.

आतापर्यंत मालवणकडे जाणारे रस्ते खड्ड्यात होते. त्यामुळे लोक जायबंदी होत होते. आता ऑक्सिजन अभावी मरायची वेळ शहरवासीयांवर आली आहे. त्याची जबाबदारी आमदारांची नाही तर कुणाची ?

मंदार केणी यांनी आमदारांची वकिली करण्यासाठी धडपड करू नये. शिवसेनेत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते चिवचिवाट करीत आहेत. आमदार ताडपत्रीचा धंदा करतात अशी टीका केणी यांनीच दोन वर्षांपूर्वी केली होती. आता त्यांनी स्वतः त्या धंद्यात एखादे छोटेसे कंत्राट घ्यावे, असा आमचा सल्ला आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दत्ता सामंत यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेताना केणी यांनी पक्षाला विचारले होते का, हा मोठा प्रश्न आहे. विचारले नसेल तर पक्षातून त्यांची हकालपट्टी निश्चित आहे. गणेश कुशे नगरसेवक गटनेता मालवण नगरपरिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!