*कोकण Express*
*खोक्रल गावचे लसीकरणात शंभरी यश*
*खोक्रल ग्रामपंचायत सरपंच देवेंद्र शेटकर*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी व दोडामार्ग पंचायत समिती सदस्य बाळा नाईक यांच्या प्रयत्नाने दोडामार्ग तालुक्यातील खोक्रल गाव आज ४५ वर्षावरील सर्व लोकांचे १००% लसीकरण करून घेणारा पहीला गाव ठरला.
आज दि.२९/०५/२०२१ रोजी खोक्रल येथे सकाळी कोविड १९ लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात दोडामार्ग पंचायत समितीचे मा.उपसभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापुन करण्यात आली.यावेळी सरपंच देवेंद्र शेटकर,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री.दिपक गवस,वैद्यकीय अधिकारी बी.डी.राणे,आरोग्य सहाय्यक श्री.ए.बी.गवस,आरोग्य सेविका सौ.एस.शिरसाट,पी.डी.ऐडगे, संजीविनी गवस,आशा सेविका वैष्णवी शेटकर,मंगला गावडे,काजल गवस, उपसरपंच श्री.गोपाळ नाईक,सदस्य श्री.विनायक गवस,पोलीस पाटील विलास शेटकर,युवा मोर्चा संघटक प्रमोद गवस,नवनाथ साळोस्कर,सुनील गवस,युवा सेना संघटक अभिजीत गवस,प्रशांत चारी,गुरुनाथ गवस,अजय गवस,विशाल नाईक, ज्येष्ठ नागरिक गोविंद गवस,साहिल गवस,ग्रामपंचायत सदस्या अंजू गवस,हेमा गवस,सविता गवस ग्रामपंचायत कर्मचारी अमित गवस,साईनाथ गवस व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी स्वत: खोक्रल गावात भेट देवून लसीकरणाचा आढावा घेतला व दोडामार्ग तालुक्यातील खोक्रल गाव ४५ वर्षावरील लोकांच्या लसीकरणात अग्रणी राहील्याबद्द्ल गावचे सरपंच,प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशीचे आरोग्य कर्मचारी व गावातील सर्व लोकांचे कौतुक केले आहे.खोक्रल गावातील लोकांनी लसीकरणाबद्द्ल दाखविलेली जागरुकता तालुक्यातील प्रत्येकाने दाखविल्यास कोविड १९ साथरोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांचे सोबत भाजपा तालुकाअध्यक्ष श्री.प्रविण गवस व युवा नेते श्री.शैलेश दळवी उपस्थित होते.खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर व भाजपा युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष दिपक गवस यांच्या सातत्यपूर्ण मागणीतुन खोक्रल गावातील लोकांना प्राधान्याने गावातच लस उपलब्ध करून दिल्या बद्दल ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्यावतीने सभापती डॉ.अनिषा दळवी,पंचायत समिती सदस्य बाळा नाईक व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.