*कोकण Express*
*सावंतवाडीत उद्या खा. नारायण राणेंच्या हस्ते होणार कोरोना योद्ध्यांचा सन्मान*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
भाजपचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते रविवार ३० रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील काजी शहाबुद्दीन हॉल येथे डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी व अन्य कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार व त्यांनी केलेल्या कामांचा गौरव होणार आहे.
तरी सावंतवाडी मंडलातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व सेलचे अध्यक्ष, शहर कार्यकारीणी, सर्व कार्यकर्ते यांनी रविवारी सकाळी १० वाजता कोव्हिडचे सर्व नियम पाळून हजर राहावे असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब व मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.