कणकवलीत तीन व्यापाऱ्यांना पोलीस कारवाईचा दणका

कणकवलीत तीन व्यापाऱ्यांना पोलीस कारवाईचा दणका

*कोकण Express*

*कणकवलीत तीन व्यापाऱ्यांना पोलीस कारवाईचा दणका*

*कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भा.द.वि. कलम १८८ नुसार तिघांवर गुन्हे दाखल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

पटवर्धन चौकात पोलिसांकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असतानाच ज्या दुकानदारांनी लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केला अशा कणकवलीतल्या तीन दुकान मालकांवर भा.द.वि. कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्यासह कणकवली पोलिसांनी होमगार्डच्या मदतीने लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. वारंवार सूचना देऊनही अत्यावश्यक सेवेत नसतानादेखील अनेक दुकाने उघडी असल्या प्रकरणी कालच कणकवली शहरात ४० हजारांची दंडात्मक कारवाई केल्यानंतर आज देखील शहरात काही अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला. यात कारवाईत सुनीता शॉपिंग सेंटरचे अनिल घाडीगावकर, ओमकार फुटवेअरचे शरद जाधव व शालेय पुस्तक भांडारचे विशाल हर्णे या तिघांवर भादवि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी दिली. या कारवाईत पोलीस हवालदार कैलास इम्पाळ, नितिन बनसोडे, राकेश चव्हाण, वाहतूक पोलीस चंद्रकांत माने व अन्य पोलिस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!