*कोकण Express*
*कणकवलीत पोलीसांशी हुज्जत घालणे पडले महागात…!*
*बौद्धवाडी येथील एकाला पोलीसांनी घेतले ताब्यात…!*
*बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची पोलिसांची माहिती…!*
*तर पोलीसांनी आपल्या कानशिलात मारल्याचा केलाय आरोप त्याने…!*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कणकवली पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथक व पोलीसांशी हुज्जत घालत अरेरावी केल्या प्रकरणी तरंदळे बौद्धवाडी येथील अजित मनोहर कदम पोलीसांनी ताब्यात घेतले. एकेरी भाषेत पोलीसांना दादागिरी करण्याचा त्या तरुणाचा प्रयत्न अखेर त्याच्या अंगाशी आला. तो तरुण मद्यपान करून असल्याचे पोलीसांनी सांगितले. आरोग्य पथकाच्या कर्मचार्यांनाही त्याने वारंवार त्रास देत एकेरी भाषेत बोलून त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला.
दरम्यान याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने तरुणाने पोलीसांनी देखील वाद घातला. तसेच खंडागळे यांच्या देखील अंगावर जात अरेरावीचा प्रयत्न केला. तर त्या तरुणाकडून पोलीसांनी माझ्या कानशिलात मारले असा आरोप केलाय.
अखेर त्याला पोलीसांनी ताब्यात घेत त्याला पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तो तरुण मद्यपान करून असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली. नशेत असलेल्या त्या तरूणाने केलेले प्रताप आता त्याला महागात पडणार आहे. त्या तरुणाला वैद्यकीय चाचणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथे देखील त्या तरुणाने पोलीसांशी वाद घातल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलीसांकडून त्यांच्यावर बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सागर खंडागळे यांनी दिली. हा प्रकार कणकवली पटवर्धन चौकात आज दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला याप्रसंगी तेथे पोलिसांसह कणकवली मुख्याधिकारी व नगरपंचायत चे पथक देखील उपस्थित होते. यापूर्वी ही या संबंधिताकडून एका वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये घुसत अशाच प्रकारे दंगा केला होता! त्यावेळी ही त्याला समज देऊन सोडण्यात आले होते. अशी माहिती मिळत आहे.