*कोकण Express*
*आम.नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; कणकवलीत आणखीन दोन रुग्णवाहिका*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील वरवडे आणि काळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रांना दोन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत.आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने या रुग्णवाहिका मिळाल्या आहे.
काळसुली आणि वरवडे या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकाची गरज ओळखून त्या मिळाव्याय या साठी आरोग्य विभागाला आमदार नितेश राणे यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यात जनतेची असलेली मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी आरोग्य सचिवांसोबत आमदार नितेश राणे बोलले होते.
त्यानुसार कणकवली तालुक्यातील काळसुली आणि वरवडे या आरोग्य केंद्रांना दोन रुग्ण वाहिका देण्यात आल्या आहेत.हा रुग्णवाहिका दिल्या बद्दल भाजपा शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना सावंत व सर्व जिल्हा परिषद सदस्यांचे आभार मानले आहेत.

