*कोकण Express*
*शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई*
*प्रभारी पोलिस निरीक्षक मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे कारवाई*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी चे प्रभारी पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून, त्यांची रिपीट टेस्ट देखील करण्यात येत आहे. अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी अनेकांची वाहने थांबवून पोलिस चौकशी करत आहेत.