*कोकण Express*
*सकाळचे बातमी अपडेट : २९ मे २०२१*
■ राज्यात आज 20,740 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 31,671 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 93.24% इतका आहे.
■ बृहन्मुंबई महानगरपालिकाने परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेशाची पुष्टी मिळविलेल्या आणि ज्यांना त्यासाठी रोगप्रतिबंधक लस टोचणे आवश्यक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील तीन केंद्रावर मोफत आणि वॉक-इन लसीची व्यवस्था केली आहे.
■ महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परिणामी, राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा अनेक अडचणींना सामोरे जावा लागत आहे.
■ अमेरिकेतील टीव्ही शो ‘फ्रेंड्स: द रीयूनियन’ गुरुवारी रिलीज करण्यात आला. या शो चा पहिला पार्ट अत्यंत हिट ठरला. त्यामुळे प्रेक्षक दुसऱ्या पार्टची अगदी आतुरतेने वाट पाहत होते.
■ पश्चिम उपनगरासाठी असलेल्या मेट्रो-2 आणि मेट्रो-7 या आता चाचणीसाठी सज्ज झाल्या आहेत. या दोन्ही मेट्रोची चाचणी सोमवारी केली जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
■ कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरी उड्डाण संचालनालयाने यासंदर्भातील पत्रक जारी केले आहे.
■ कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यासंदर्भात राज्यातील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांनी काही मागण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे.
■ मुंबईत आज कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून 929 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
■ मागील आठवड्यात अंदमान-निकोबारमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर आता पश्चिम किनारपट्टीवरील केरळ, महाराष्ट्र ही राज्य मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथे यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे हवाई पहणी केली.
■ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ने विकसित केलेले देशातील प्रथम कोविड ओरल ड्रग 2- डीजीची किंमत निश्चित केली गेली आहे. कोविड प्रतिबंध या औषधाची किमंत 990 इतकी ठरवण्यात आली आहे.
■ कोविड-19 लसीकरणावरुन केंद्र सरकारवर सातत्याने होणाऱ्या टीकेला आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिले आहे. भारतातील कोविड-19 लसीकरण डिसेंबर 2021 पूर्वी पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
■ Maratha Reservation बद्दल सरकारने 6 जून पर्यंत भुमिका स्पष्ट करावी अन्यथा रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु असा भाजप खासदार संभाजी छत्रपती यांनी इशारा दिला आहे.
■ कोरोना महामारीच्या संकट काळात सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.
■ अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वैकल्पिक सीईटी द्यावी लागणार असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
■ पुण्यामधील अत्यावश्यक सेवा आता शनिवार-रविवारी देखील सुरु राहणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटद्वारे दिली आहे.