*कोकण Express
*जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते लोरे नं 1 गावात ‘घर तिथे शोषखड्डा’ योजनेचा शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत लोरे नं 1 येथे “जि. प. आदर्श गाव योजना व जलशक्ती योजना अंतर्गत “घर तिथे शोषखड्डा” या योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,लोरे नं 1 सरपंच अजय रावराणे, उपसरपंच अनंत रावराणे, ग्रा. पं. विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग व शिंदे, सदस्य नरेश गरव, सामाजिक कार्यकर्ते मकरंद पारकर, रोहीनी रावराणे, सुनिता नापनेकर, पूनम मोसमकर, रसिका राणे, माजी सरपंच सुमन गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष महेश रावराणे, उपस्थित होते.
जि. प. अध्यक्ष संजना सावंत व गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत सरपंच अजय रावराणे यांनी केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामसेवक संगिता पाटील यांनी केले.