*कोकण Express*
*कुंभवडे, दारिस्ता,भिरवंडे गाव पातळीवर लसीकरण व कनेडी गावातील लाभार्थ्यांना घर दुरुस्ती धनादेश वितरण ; संजना सावंत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ग्रामीण भागात लसीकरण अंतर्गत अध्यक्ष संजना सावंत यांनी कुंभवडे, दारिस्ता, कनेडी, भिरवंडे या ग्रामपंचायत क्षेत्रात शुक्रवार दी. २८.०५.२०२१ रोजी लसीकरण मोहिमेला सुरुवात करून दिली. या मोहिमेअंतर्गत कुंभवडे गावात 50,दारिस्ता गावात 50,भिरवंडे गावात 50 लसीचे वितरण करून लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रत्येक गावाला लस उपलब्ध करून देण्याचे जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट असून त्यानुसार कार्यवाही होत असल्याचे अध्यक्ष संजना सावंत यांनी सांगितले यावेळी कनेडी गावातील घर दुरुस्ती अंतर्गत मंजूर लाभधारकांना धनादेशाचे वितरण देखील अध्यक्ष संजना सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.