अतुल बंगे यांनी आधी आपली बौद्धिक उंची वाढवावी नंतरच रणजीत देसाई यांच्यावर टीका करावी:- भाजप तालुका उपाध्यक्ष राजा धुरी

अतुल बंगे यांनी आधी आपली बौद्धिक उंची वाढवावी नंतरच रणजीत देसाई यांच्यावर टीका करावी:- भाजप तालुका उपाध्यक्ष राजा धुरी

*कोकण  Express*

*अतुल बंगे यांनी आधी आपली बौद्धिक उंची वाढवावी नंतरच रणजीत देसाई यांच्यावर टीका करावी:- भाजप तालुका उपाध्यक्ष राजा धुरी*

*बंगे हे पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे उदाहरण देतात. मग त्यांच्या पक्षाचे संजय राऊत बेळगावला गोट्या खेळायला गेले होते का ?*

*कुडाळ ः  प्रतिनिधी*

कोविड उपाययोजनांसाठी केंद्राने हजारो कोटी खर्च केले असताना देश कोविड मुक्त होणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात मात्र आपला देश कोविड मुक्त झाला नाही उलट देशात कोरोनाची दुसरी लाट आली. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपयश आहे, मग याचा जाब रणजित देसाई पंतप्रधानांना विचारणार का? हा अतुल बंगे यांचा सवाल वाचला आणि हसू आले. आपले पद काय ? आपली बुद्धी किती ? आपण बोलतो काय ? आपली माहिती किती ? याचा विचार न करताच काही लोक जीभ टाळ्याला लावतात. अतुल बंगे हे त्यातले एक आहेत. त्यांनी आधी आपली बौद्धिक उंची वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे.

देशाला जसा पंतप्रधान असतो तशीच देशात घटकराज्ये असतात. आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार त्या घटकराज्यांना मुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली एक आरोग्य मंत्री असतो. राज्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी त्या त्या राज्यांची असते. केंद्र धोरण ठरवते आणि निधी देते. अंमलबजावणी राज्याने करायची असते. हे सारे पाचवीच्या नागरिकशास्त्रात शिकवतात. अतुल बंगे कदाचित पाचवीत गेले नसतील म्हणून त्यांना हे माहिती नसावे. बंगे यांच्या पक्षाचे सरकार आणि नेते १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यात आणि गरीब व्यापाऱ्यांची हत्या करण्यात व्यस्त होते, तेव्हा केंद्र राज्यांना लसींचा पुरवठा करीत होते. आज बंगे यांच्या पक्षाचे सरकार लसीकरणात राज्य प्रथम क्रमांकावर आहे, असे ढोल वाजवते त्या लसी वांद्र्याच्या मातोश्रीतुन आलेल्या नाहीत. त्या केंद्रानेच दिलेल्या आहेत. हे बंगे यांनी माहिती करून घ्यावे. बंगे यांचे मालक मुख्यमंत्री एका चेकने संपूर्ण महाराष्ट्राला लागणारी लस खरेदी करणार होते. तो चेक कुठे गेला ? आणि त्यातून येणाऱ्या लसी कुठे आहेत ? याची माहिती बंगे यांनी करून घ्यावी आणि आम्हालाही द्यावी.

अतुल बंगे हे पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे उदाहरण देतात. मग त्यांच्या पक्षाचे संजय राऊत बेळगावला गोट्या खेळायला गेले होते का ? महाराष्ट्रात निवडणुका नव्हत्या, मग इथे रुग्णसंख्या का वाढली ? या प्रश्नाचे उत्तर बंगे याना देता येणार नाही, कारण त्यासाठी अभ्यास आणि शिक्षण दोन्ही लागते.

बंगे यांनी रणजीत देसाई यांच्यावर केलेली टीका ही आमदार वैभव नाईक यांना खुश करण्यासाठी केली आहे, बाकी बंगे यांना त्यातले काही कळत नाही, हे जनतेला माहिती आहे. एवढा आटापिटा करण्यापेक्षा जिल्ह्याला आलेले २१ कोटी रुपये खर्च करूनही जिल्हा रेडझोनमध्ये का ? या देसाईंच्या प्रश्नाचे उत्तर वास्तविक बंगे यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांना विचारले असते तर जिल्ह्याच्या जनतेच्या हिताचे ठरले असते.

रणजीत देसाई यांनी कुणाला आणि काय काय मदत केली याच्या फंदात तर बंगे यांनी पडूच नये. देसाईंच्या मदतीचे आकडे बंगे याना लिहितासुद्धा येणार नाहीत. त्यापेक्षा वैभव नाईक यांनी स्वतःच्या खिशातून कुणाला चाराणे तरी दिले आहेत का ? याची माहिती करून घ्यावी. इकडे तिकडे फिरायचे, गप्पा मारायच्या आणि स्वतः काही करायचे सोडाच, सरकारी योजनाही धड राबवायच्या नाहीत, हि वैभव नाईक यांची स्टाईल जनतेला कळून चुकली आहे.

पीएम केअर, लसीकरण धोरण हे बंगे यांचे विषय नाहीत. वैभव नाईक यांना खुश करणे हा बंगे यांचा एककलमी कार्यक्रम आहे. तो त्यांनी करावा. आता होम आयसोलेशन बंद झाले आहे आणि गावागावात कोव्हीड केअर सेंटर उभारण्याचा अजब निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. तेव्हा बंगे यांनी आमदारांच्या वशिल्याने एखाद्या कोव्हीड सेंटरचे कंत्राट घेऊन वर्षभराची बेगमी करावी, तेवढेच त्यांना जमू शकते. उगाच तोंडाच्या वाफा दवडून, न झेपणाऱ्या विषयांत पडणे म्हणजे बेडकीने बैल होण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे, हे बंगे यांनी लक्षात घ्यावे.राजा धुरी
भाजप कुडाळ तालुका उपाध्यक्ष यांचा पलटवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!