*कोकण Express*
*कणकवलीतील चोरटी दारू विक्री बंद करा!*
*कणकवली बार असोसिएशनची राज्य उत्पादन शुल्काकडे मागणी!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीतील बार व परमिट रूम परवानाधारक प्रामाणिकपणे शासकीय नियम पाळून नियमांची अंमलबजावणी करीत आहोत. मात्र, कणकवली शहरात व गावागावात चाललेली चोरटी दारू विक्री जोरात सुरू आहे. या प्रकारामुळे आम्ही अडचणीत सापडलो आहोत. तरी याबाबत चौकशी करून या प्रकाराला आळा घालावा अशी मागणी कणकवली बार असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम धुमाळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
कणकवली तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम धुमाळे यांनी आज राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवलीला दिले आहे यावेळी त्यांच्यासमवेत गुरु काळसेकर ,वैभव महाडिक,कुंदन हर्णे ,अमोल कोळी उपस्थित होते.
या निवेदनात ते म्हणतात, बार व परमिट रूम परवानाधारक यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात लॉकडाऊन कालावधीमध्ये गोवा बनावटीची दारू खुलेआम व चोरुन विक्री करत असलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आम्ही परमिट रूमधारक असून कणकवली रहिवासी असून शासनाच्या परवान्याने बार व परमिट रुम चालवितो. गेले वर्ष – दीड वर्ष कोरोनाचा प्रादुर्भावामुळे व्यवसाय बंद ठेवावा लागला तर काही अंशी शासनाच्या मान्यतेनुसार पार्सल सेवा देऊन व्यवसाय करतो आहोत. पण अशा परिस्थितीमुळे कामगारांचा पगार, भाडे, लाईट बिल, बॅंक कजांचे हप्ते, शासनाचा कर भरणे फारच अडचणीचे झाले, असून सर्व परवानाधारकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. केवळ शासनाचा परवान्यानुसार पार्सल सेवा देऊन थोडाफार धंदा होत होता तोही मंदावलेला आहे. पण याबाबत चौकशी केली असता, कणकवली तालुक्यातील गावागावात गोवा बनावटीची स्वस्त दारू आणून त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे आमच्या व्यवसायावर त्याचा फार मोठा परिणाम होत आहे. तरी शहरात व गावागावात चाललेली ही चोरटी दारू विकी बाबत आपण योग्य प्रकारे चौकशी करून त्याला आळा घालावा अशी मागणी केली आहे.