*कोकण Express*
*राणेंच्या कार्यकर्त्यांवर बोलणाऱ्या पारकरांच्या भाजपा नेत्यांच्या बंगल्यावर येरझाऱ्या कशासाठी ?*
*कणकवली ः (संजना हळदिवे)*
ज्यांना राणेंच्या जीवावर महामंडळ मिळाले,त्यांना आता संघटनेतील साध शाखा प्रमुख पद सुद्धा मिळवण्या करिता धडपड करावी लागते. त्यामुळेच भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या सावंतवाडी – केसरी मधील बंगल्यावर संदेश पारकर यांना येरझऱ्या घालाव्या लागत आहेत. तर अधुन – मधून पुन्हा काँग्रेसमध्ये आपल्याला कोणी घेईल का ? याची चाचपणी पारकर यांना करावी लागत आहे असा टोला नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी लगावला. कणकवली नगरपंचायत मध्ये स्वीकृत नगरसेवक असलेले कन्हैया पारकर यांनी आपला राजीनामा गहाण ठेवून राणेंवर बोलावे हे नवलच आहे. राणेंच्या घरात एक खासदारकी,आणी एक आमदारकी आहे . त्यामुळे कन्हैया पारकर यांनी आपल्या व आपल्या भावाच्या राजकीय कारकीर्दीकडे डोकावून पहावे. राणेंबद्दल काळजी करायची कन्हैया पारकर यांना गरज नाही. जिल्हा परिषद पासून ग्रामपंचायत पर्यत सत्तास्थाने राणेंकडे आहेत. त्यामुळे पारकर यांनी आपल्या शेतात उरली सुरली एक दोन बूजगावणी राहिलीय त्याची काळजी घेणे अधिक शहाणपणाचे ठरेल. राणेंच्या कार्यकर्त्यांवर बोलण्यापेक्षा संदेश पारकर हे काँग्रेस मध्ये असताना विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्याशी प्रमोद जठार यांच्यामार्फत अनेक गुप्त मिटिंग केल्या. कणकवली नगरपंचायत निवडणूकित स्वतःच्या भावाला तिकीट देऊ शकले नाहीत. तेव्हा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कन्हैया पारकर यांना स्वीकृत नगरसेवक पद दिले. ते पद नाही ते शिवसेनेतील जुन्या शिवसैनिकांना देऊ पाहत नाहीत. भारतीय जनता पक्षातील ही मळ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत गेली आणि भाजपा पक्ष निर्मळ झाला असा टोला परुळेकर यांनी लगावला.