*कोकण Express*
*जादा दराने खते विक्री केल्यास कारवाई ; गुरूदास गवंडे*
*दुकानदाराकडून छापील पावती घ्यावी..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील किमतीपेक्षा कुणी जास्त किमतीने खत विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे. शेतकऱ्यांनी पॉस मशीन किंवा दुकानदाराची छापील पावती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिना पावती शिवाय खत खरेदी करू नये, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा उपसरपंच, निगुडे गुरूदास गवंडे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या एनबीएस धोरणानुसार युरिया खत वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचा अधिकार त्या त्या रासायनिक खत उत्पादक कंपनीस आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असा दाखला देत काही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खते या खतांच्या किमतीत वाढ केली आहे. सद्य:स्थितीत बाजारात जुन्या दराची खतेसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे सावंतवाडी तालु्नयातील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या गोणीवर छापलेल्या किमती तपासून त्याप्रमाणेच रक्कम देऊन खते खरेदी करावीत, असे गुरूदास गवंडे यांनी सांगितले.
छपाई किमतीपेक्षा जादा किंमत आकारता येत नाही. रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दराची खते (जुने दर छपाई असलेल्या बॅगा) जुन्याच दराने शेतकऱ्यांना विकणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे. कुणी विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्री.ओहोळ म्हणून अधिकारी आहेत त्यांच्याजवळ ही तक्रार करू शकता किंवा आपल्याकडे तक्रार करावे, असे ते म्हणाले.

