जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विनाकारण फिरणाऱ्याची आता सरप्राईज रॅपिड टेस्ट

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विनाकारण फिरणाऱ्याची आता सरप्राईज रॅपिड टेस्ट

*कोकण  Express*

*जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विनाकारण फिरणाऱ्याची आता सरप्राईज रॅपिड टेस्ट*

*दिवसभरात १५० लोकांच्या करण्यात येणार रॅपिड टेस्ट*

*फिरते विक्रेते, भाजीविक्रेते, व्यापारी, विनाकारण फिरणाऱ्यांची होणार टेस्ट*

*कणकवली 🙁 संंजना हळदिवे)*

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विनाकारण फिरणाऱ्याची आता सरप्राईज रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी कणकवली शहरात आज सकाळपासून सुरू करण्यात आली. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी स्वतः उपस्थित राहत शहरात विनाकारण फिरणारे, भाजीविक्रेते, व्यापारी, रिक्षा व्यावसायिक आदींची रॅपिड टेस्ट करणे भाग पाडले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिवसभरात दीडशे रॅपिड करण्यात येणार असून कणकवली शहरात वाढणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याधिकारी अवधूत तावडे हे स्वतः फिल्डवर उतरले आहेत. पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथकामार्फत ही टेस्ट करण्यात येत असून नगरपंचायत कर्मचारी, पोलीस व आरोग्य विभाग यांच्या फिरत्या पथकाद्वारे देखील टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली.
पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथकात समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्वी पारकर, गिलबर्ट फर्नांडिस, प्रदीप मांजरेकर, नगरपंचायत कर्मचारी रवी महाडेश्वर, प्रशांत राणे, संतोष राणे, रमेश कदम, यांच्यासह तालुका आरोग्य समन्वयक निखील जाधव आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्यासह पोलीस पथकाने अकरा वाजल्यानंतर शहरात गस्त सुरू केली होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पोळ यांनी पटवर्धन चौकात उपस्थित राहत या रॅपिड टेस्टचा आढावा घेतला. आतापर्यंत सुमारे २० रॅपिड टेस्ट करण्यात आले असून अद्याप एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!