*कोकण Express*
*विनाकारण फिरणाऱ्यांची आता होणार ॲन्टीजन टेस्ट*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
विनाकारण फिरणार्यांवर कारवाईसाठी आता कुडाळ तहसिलदार अमोल पाठक यांनी विशेष फिरते भरारी पथक नेमले आहे. सहा कर्मचारी असलेले हे पथक कुडाळ तालुक्यात बुधवार पासुन कार्यरत झाले असून विनाकारण फिरणार्यांची हे पथक अँन्टीजन टेस्ट करणार आहे. या पथकाने पहिल्या दिवशी ३० विनाकारण फिरणार्यांची अँन्टीजन टेस्ट केली . यातील तिसही जण निगेटिव्ह आले. या पथकात दोन आरोग्य विभाग, दोन नगर पंचायत व दोन पोलिस असे सहा कर्मचारी कार्यरत असणार आहेत. हे पथक कोणत्याही क्षणी कोठेही जाऊन तपासणी करणार आहे. अशी माहिती कुडाळ तहसिलदार अमोल पाठक यांनी दिली .