*कोकण Express*
*जिल्हा रेड झोनमध्ये म्हणजे लाजीरवाणी बाब*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे राज्यातील रेड झोन घोषित केलेल्या निवडक 18 जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला.अशी का वेळ आली आपल्या जिल्ह्यावर याचे आत्मचिंतन आतातरी शासकीय अधिकारी आणि जबाबदार लोकप्रतिनिधींना करण्याची वेळ आलीय अस म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आज सिंधुदुर्गात एकूण बेड संख्या केवळ 1504 एवढी आहे, मग उर्वरित 3611 कोरोना रुग्णांची सोयीचे काय? तसेच आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन किती महिने घालवणार असा प्रश्न आधार फाउंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांना आरोग्य विषयक सोयी सुविधा देण्यास जिल्हा प्रशासन कमी पडले आणि त्यामुळेच आता पर्यंत 620 लोकांचे जीव गेले.मागील 15 महिन्याचा कालावधी कमी कसा पडला या जबाबदार लोकांना असा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून बसलाय. नक्की अजुन आपण कोणाची वाट बघतोय हा संशोधनाचा भाग आहे. 4155 सक्रिय रुग्णांना घरातून बाहेर काढल्यावर ठेवणार कुठे याच उत्तर कधी मिळेल याबाबत संभ्रम आहे.. गणेश चतुर्थी, दिवाळी नंतर हळू हळू CCC, DCHC, DCH यांची तालुकानिहाय संख्या वाढवली असती तर आज ही परिस्थिती जिल्ह्यातील नागरिकांवर आली नसती. प्रत्येक तालुक्यात निवडक सामाजिक कार्यकर्ते, लोक प्रतिनिधी, सुजाण नागरिक, पत्रकार ज्या सूचना, मागण्या गेली 15 महिने करीत आहेत त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. किमान इथून पुढे तरी त्या सर्व तळमळीने काम करण्याऱ्या लोकांना विश्वासात घेऊन पुढील 3 महिन्याचा सूक्ष्म आराखडा नव्याने तयार करा, पेशंटना नेमकं काय पाहिजे हे शासकीय अधिकाऱ्यानं पेक्षा हीच लोक परखड पणे सांगू शकतात. ही वेळ एकत्र येऊन कोरोना विरूध्द तीव्र लढा देण्याची आहे,. आम्हाला योग्य वाटतं म्हणून आम्ही तसेच निर्णय घेणार ही एकतर्फी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेणे आता तरी बंद करावे ही हाथ जोडून विनंती,आहे असे श्री. वेंगुर्लेकर यांनी म्हटले आहे.