*कोकण Express*
*स्वॅब देणारी व्यक्ती बाहेर फिरल्यास दहा हजारांचा दंड अथवा थेट घरावर बोजा…*
*सावंतवाडी तहसीलदारांचा इशारा;पुढचे दहा दिवस कोणत्याही कार्यक्रमासाठी परवानगी नाही…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
स्वॅब देणारी व्यक्ती बाहेर फिरताना आढळून आल्यास तब्बल दहा हजाराचा दंड अथवा संबंधितांच्या घरावर थेट बोजा चढविण्यात येणार आहे.आज पासून पुढचे दहा दिवस कोणत्याही कार्यक्रमासाठी परवानगी नाही,आणी दिलेल्या परवानगीवर भरारी पथकाचे लक्ष असेल,असा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिला.