*कोकण Express*
*मळेवाड कोंडूरे गावात विलगीकरण कक्ष सुरु…*
*सरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश*
*मळेवाड ःःप्रतिनिधी*
मळेवाड कोंडुरे गावात गाव विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी लागणारी शाळा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ताब्यात दिल्याने अखेर हा कक्ष गावात सुरू होणार आहे.
मळेवाड कोंडूरे गावात विलगीकरण कक्ष सुरु करण्यासाठी सरपंच हेमंत मराठे यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे निवेदन देऊन परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. यानंतर ज्या शाळेत हा कक्ष सुरू करण्यात येणार होता, त्या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीने शाळा देण्यास नकार असल्याचां ठराव घेत नकार दर्शवला होता. यामुळे गावातील हा कक्ष सुरु होण्याआधीच वादात सापडला होता. मात्र सरपंच हेमंत मराठे यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे पाठपुरावा करत हा कक्ष सुरु करण्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.तसेच शालेय व्यवस्थान व्यवस्थापन समितीने नकार दर्शवल्याचेही म्हात्रे यांना सांगितले. यामुळे मंगळवारी तहसीलदार म्हात्रे यांनी ग्रामपंचायतला भेट देऊन सरपंच हेमंत मराथे यांच्याबरोबर गाव विलगीकरण कक्षा बाबत चर्चा केली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीने नकार दिल्याने अध्यक्ष प्रकाश राऊत यांना प्रत्यक्ष बोलून हा कक्ष सुरु करण्यासाठी कोणालाही अटकाव करता येणार नाही असे सांगत शाळा ताब्यात देण्याबाबत आपण तात्काळ पत्र देतो असे सांगितले. तसेच हा कक्ष सुरू करण्यासाठी पुढील उपाय योजना सुरू करा आणि लवकरात लवकर गावातील लोकांच्या सेवेसाठी हा कक्ष सुरु करावा अशी सूचना केली.त्याचबरोबर गावात जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि ते विलगीकरणात न राहता बाहेर फिरत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करत रोख रक्कम रुपये दहा हजार दंड वसूल केला जाईल. सदरचा दंड त्या व्यक्तीने न भरल्यास त्याच्या सातबारा किंवा घरावर बोजा ठेवण्यात येईल असे म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी म्हात्रे यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत वैद्यकिय अधिकारी व आशा सेवीका यांच्याशी चर्चा करत कोरोना बाबत योग्य नियोजन करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मेहनत घ्या.तसेच लोकांनी घाबरु न जाता लक्षणें दिसताक्षणी उपचार घ्या असेही आवाहन केले.यावेळी ग्रा पं सदस्य सानिका शेवडे, ग्रा पं सदस्य गिरीजा मुळीक, ग्राम विकास अधिकारी अनंत गावकर, मंडळ अधिकारी निगुडकर, आरोग्य सेवक बाबली गवंडे, आरोग्य सेवक राणे,आशा सुपर वायझर रेगे, नंदू नाईक, बाळा शिरसाट, अनिल नाईक, संजू शिरोडकर, आदी उपस्थित होते.