नाटळ येथील लसीकरण केंद्राचा शुभारंभ जि.प.अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते

नाटळ येथील लसीकरण केंद्राचा शुभारंभ जि.प.अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते

*कोकण Express*

*नाटळ येथील लसीकरण केंद्राचा शुभारंभ जि.प.अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते*

*कणकवली ः (संजना हळदिवे)*

ग्रामीण भागातील लोकांना लसीकरण करण्यासाठी मुख्यत्वे  वाहातुकीची काहीही उपलब्धता नाही. ज्यांची वाहने आहेत ते जाऊ शकतात मात्र अन्य ग्रामस्ताना लशिकरणाला जाता येत नाही .

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर या परिसरातील गावातील लोकांची गर्दी होते. तरी वृद्ध लोकांना प्रवास करावा लागू नये तसेच त्यांना गावच्या गावात लसीकरण करून घेणे शक्य व्हावे याकरिता जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी जिल्ह्यातील २४८ उपकेंद्र स्तरावर किंवा गावातील ग्रामपंचायतींमध्ये रोटेशन पद्धतीने लसीकरण उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेच्या सुरवातीच्या टप्प्यात लसीकरणादरम्यान येणाऱ्या समस्या व लसीकरणाचे एकंदरीत काम काज याची पाहणी करण्यासाठी आज
कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा आढावा घेत शुभारंभ केला .  ग्रामपंचायत नरडवे येथील लसीकरण केंद्राची पाहणी केली.यावेळी सरपंच अमिता सावंत, उपसरपंच सुरेश ढवळ, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उपस्थित होते.

ग्रामपंचायत नाटळ येथील लसीकरण केंद्रावर सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच दत्तू खरात ,ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर ,तलाठी निलांबरी पवार ,कृषी सहाय्यक एम डी वरने ,डॉ . हेनरी चोडणेकर ,ग्रामपंचायत सदष्य उपस्थित होते. शिवडाव उपकेंद्र येथील लसीकरण केंद्रावर सरपंच ,उपसरपंच उपस्थित होते. हरकुळ खुर्द उपकेंद्रावर देखील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या पूर्ण लसीकरण मोहीम पाहणीवेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पोळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!