*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 553 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह; 8 जणांचा मृत्यू*
*जिल्ह्यात एकूण 18 हजार 514 रुग्ण कोरोनामुक्त*
*सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 635 – जिल्हा शल्य चिकित्सक*
*सिंधुदुर्गनगरी :(संजना हळदिवे)*
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 18 हजार 514 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 635 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 553 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
