घोणसरी येथील हॉटस्पॉट भागात केली रॅपिड टेस्ट

घोणसरी येथील हॉटस्पॉट भागात केली रॅपिड टेस्ट

*कोकण Express*

*घोणसरी येथील हॉटस्पॉट भागात केली रॅपिड टेस्ट*

*५०रॅपिड टेस्टमध्ये तब्बल ११ पॉझीटिव्ह रुग्ण*

*कणकवली ः (संजना हळदिवे)*

कणकवली तालुक्यातील घोणसरी गावातील वाढत्या कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांचा आकडा लक्षात घेता सभापती श्री मनोज रावराणे यांच्या मागणीनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ यांच्या आदेशानुसार फोंडाघाट प्रा.आ.केंद्रातील टीम घोणसरी गावात स्पॉट वर येऊन ५० लोकांची रॅपिड टेस्ट केली त्यामध्ये तब्बल ११ लोक पॉझीटिव्ह मिळाले.पॉझीटिव्ह मिळालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले अशी माहिती घोणसरी आरोग्यसेवक श्री. शंकर राठोड यांनी दिली.

यावेळी फोंडाघाट प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जंगम, घोणसरी उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसन्ना पाटील,आरोग्यसेवक श्री शंकर राठोड, आरोग्यसेविका श्रीमती देवरुखकर, श्रीमती पेडणेकर,श्रीमती मढवी तपासणी ठिकाणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!