*कोकण Express*
*कणकवली शहरातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी व्यवस्था करावी!*
*विरोधी गटनेते सुशांत नाईक यांची कणकवली मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी!*
*कणकवली ः ( संजना हळदिवे)*
राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांकडून होम आयसोलेशन पूर्णता बंद करण्याबाबत आदेश दिल्यामुळे आता कणकवली शहरात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना उपचाराकरिता बेडची तातडीने व्यवस्था करावी. त्याकरिता शहरातील शाळा किंवा अन्य सार्वजनिक वास्तु अधिग्रहित करून शहरातील रुग्णांची व्यवस्था करावी, अशी मागणी विरोधी गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांनी मुख्याधिकार्यांकडे केली आहे.
दिवसेंदिवस शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने या रुग्णांना उपचाराकरिता ठेवण्यासाठी तातडीने व्यवस्था होण्याची गरज आहे.
याकरिता सुविधा असलेल्या शासकीय इमारती अधिग्रहित करून त्यामध्ये शहरातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था करावी अशी मागणी श्री नाईक यांनी केली आहे. मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी देखील या मागणीला सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती श्री नाईक यांनी दिली.

