संदेश पारकर यांनी मुख्यमंत्र्यांना चक्रीवादळाच्या नुकसानीचा केला अहवाल सादर!

संदेश पारकर यांनी मुख्यमंत्र्यांना चक्रीवादळाच्या नुकसानीचा केला अहवाल सादर!

*कोकण  Express*

*संदेश पारकर यांनी मुख्यमंत्र्यांना चक्रीवादळाच्या नुकसानीचा केला अहवाल सादर!*

*सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी संदेश पारकर यांना दिले होते आदेश!*

*जिल्ह्याला १५० कोटींचे पॅकेज मंजूर करण्याची केली मागणी!*

*कणकवली ः ( संजना हळदिवे)*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रिवादळामुळे मोठा फटका बसला आहे. शेती, बागायती, महावितरण, घरे, शासकीय इमारती, मच्छीमार आदींचे मिळून सुमारे १५० कोटींच्या जवळपास नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई मिळण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने आपल्या आदेशानुसार तयार करण्यात आलेला अहवाल आपणाला सादर करीत आहे. सिंधुदुर्ग तोक्ते वादळ हानी अहवाल फळबागायतदार व शेतीचे नुकसान – जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फळबागायतदार व शेतकाऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

आंबा, काजु, नारळ, पोफळी, कोकम, केळी यांचे खूपच नुकसान झालेले आहे. यासाठी नेहमीचे निकष न लावता सरसकट नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम यांचे जे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत केवळ भरपाई देऊन नाही तर एकेक झाड वर्षानुवर्षाचा उत्पन्नाचा आधार असते. याचा विचार करुन भरपाई मिळावी. या वादळामुळे झाडे गोलाकार फिरल्याने त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. याचाही विचार व्हावा, कृषी विभागाकडून गांभीर्याने सर्वे झालेला नाही. त्याबाबत वस्तुनिष्ठ सर्व्हेचे आदेश देण्यात यावेत. घर, गोठे, उमारती, शासकीय कार्यालये यांचे नुकसान – घरांना, गोठ्यांना, इमारतींना, शासकीय कार्यालयांना वादळाचा मोठा फटका बसला असून काही घरांची व गोठयाची छपरे उडुन गेली आहेत. याचा देखील गांभीर्यपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. वादळाने काही घरांचे जरी अंशत : नुकसान झालेसे असले तरीही दुरुस्ती साठी खर्च मोठा आहे. अनेक ठिकाणी घराच्या मध्यभागाच्या मुख्य लाकडांपर्यंत पडझड झालेली आहे. त्यामुळे पुर्णतः नुकसान धरुनच भरपाई निधी मिळावा.

मच्छिमारांचे नुकसान – काही मच्छिमारांच्या नौका बुडाल्या आहेत, तर अनेक जाळी वाहुन गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. बंदरावर उभ्या असलेल्या नौका मोठ्या मुळे कलंडल्या आहेत तर काही नौका खडकांवर जाऊन आदळल्या आहेत. छोट्या नौका तर अक्षरश : वाहुन गेल्या आहेत. मच्छिमारांचे तर खूपच मोठे नुकसान झाले आहे. यात काही खलाशांचा मृत्यू झाला आहे त्यांना तातडीची शासकीय मदत मिळणे आवश्यक आहे. मछिमारांच्या ज्या अनेक होत्या, छोट्या मोठ्या बोटी वाहून गेल्या आणि तुटल्या आहेत त्या वाहून जाताना अडविण्याच्या प्रयत्नात काही लोक मृत्यूमुखी झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना देखील तातडीने जास्तीत जास्त मच्छिमारांचे जे इतर साहित्य, जाळी तसेच नोंदनिकृत नसलेल्या छोट्या होड्या वाहून मोठे नुकसान झाले आहे अशांची संख्या १५० पेक्षा जास्त आहे. त्यांचे रजिस्ट्रेशन नसल्याने पंचनामे होत नाहीत. याबाबत विशेष आदेश काढून त्यांना देखील नुकसानभरपाई मिळावी. वादळात कोही बोटी खडकावर आदळून थांबलेल्या आहेत. त्यांना आणण्यासाठी क्रेनची उपलब्ध असावी. मच्छिमार सोसायट्यांकडून कर्जे घेतलेली असून ते माफ करण्यासोबतच सोसायट्यांना मदत देण्यात यावी. भरपाई मिळावी.

विद्युत विभागाचे नुकसान – जिल्ह्यात अनेक ठिकाणी २ ते ३ हजार विजेचे पोल पडून व अनेक ट्रांन्सफार्मर निकामी होऊन विद्युतप्रवाह बंद पडलेला आहे. त्यामुळे अनेक गावांत अद्यापही लाईट आलेली नाही. विद्युत विभागाचे जिल्ह्यात जास्तीत जास्त नुकसान हे देवगड, मालवण, वेंगुर्ले या किनारपट्टी भागात झाले आहे. किनारपट्टी भागात सातत्याने वादळे येत असतात. याचा विचार करता पोलवरून लाईट न घेता अंडरग्राऊड केबल टाकल्यास होणारी हानी टाळता येऊ शकते. वादळाला आठ दिवस उलटूनही जिल्ह्यात अद्याप परिस्थिती पुर्वपदावर नाही. इतर विभागातून 600 से 800 कर्मचारी आलेले आहेत. वायर सहीत कंडक्टर व इतर अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात यावा अनेक ठिकाणचे रस्ते दुरवस्था झालेले आहेत. त्यासाठी निधीची उपलब्धता करावी. धूप प्रतिबंधात्मक बंधारे – किनारपट्टी भागातील भौगोलिक परिस्थिती पाहता वादळावेळी किनारपट्टी भागात आदळणान्या अजस्त्र लाटा थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात धुप प्रतिबंधात्मक बंधारे बांधणे गरजेचे आहे. यासाठी पतन विभागाला त्वरीत सर्वे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे. किनारपट्टी भागात पत्तन विभाग, खारलैंड यांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने धुप प्रतिबंधक बंधाऱ्याची निर्मीती करण्यात यावी, कायमस्वरूपी प्रत्यक्ष आपत्कालीन रेस्क्यू टिमची गरज आपतकालीन कक्षाकडून वादळ येऊन गेल्यानंतर मदत होते. मात्र, प्रत्यक्ष वादळाच्यावेळी किंवा नैसर्गिक आपत्तीवेळी कायमस्वरुपी रेस्क्यू टीम तैनात असणे गरजेचे आहे. जिल्ह्याला १२० कि.मी.ची. किनारपट्टी असून यात तीन तालुके येतात. या तीनही तालुक्यांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी प्रत्येकी एक रेस्क्यू टीम तसेच जिल्ह्यासाठी एक एनडीआरएफचे पथक कायमस्वरूपी देण्यात येणे गरजेचे आहे. तातडीने मदत मिळावी म्हणून प्रत्येक तालुक्यात आपतकालीन कक्ष तयार करणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या आनंदवाडी बंदरालाही वादळात मोठा फटका बसला आहे. अशावेळी या आपतकालीन टीम उपयुक्त होऊ शकतात. आपतकालीन कक्षामध्ये अत्यावश्यक सर्व साहित्य, जनरेटर आदीची व्यवस्था असणे गरजेचे आहे. वरील सर्व नुकसान झालेल्या बाबींचे पंचनामे लोकांच्या सांगण्यानुसार करुन तसा अहवाल होण्याची गरज आहे. तसेच जाचक नियम व अटी शिथिल करणे आवश्यक आहे. वादळामुळे काही मोठा हानी झाली आहे त्यासाठी विशेष पॅकेज म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला 150 कोटी रुपये मंजुर व्हावेत अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!