जिल्ह्यात एक हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारा!

जिल्ह्यात एक हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारा!

*कोकण Express*

*जिल्ह्यात एक हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारा!*

*संदेश पारकर यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी!*

*कणकवली ः ( संजना हळदिवे)*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाबतची आजची स्थिती अतिशय गंभीर असून कोरोना आटोक्यात येत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढतच असून अनेक रुग्णांना ॲडमिट करायला बेडच शिल्लक राहिलेले नाहीत. अपुऱ्या बेडच्या कमतरतेमुळे रुग्ण दगावात असून बरीच जीवितहानी होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता जिल्ह्यात मुंबईच्या धर्तीवर एक हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची गरज असल्याची मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यात ८०० ऑक्सिजन बेड व २०० व्हेंटिलेटर बेड देणे गरजेचे आहे. तसेच यासाठी लागणारे डॉक्टर्स, नर्स, स्टाफ व लागणारी यंत्रसामग्री मिळणे गरजेचे आहे. सध्याची दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या बघता प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडसह १०० बेड उपलब्ध अरणारी सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट तयार करणे आवश्यक आहे. तसेच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, जंबो सिलेंडर, डुरा सिलिंडर, आयसीयु बेड मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून मिळावेत. जिल्ह्यात २ कार्डियाक व ५० अद्ययावत अशा अँब्युलन्स तसेच २ शववाहिन्या मिळणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे दहन करण्यासाठी जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपरिषद क्षेत्रांत विद्युत शववाहिनी उपलद्ध करुन मिळणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कोविट टेस्ट करणाऱ्याची संख्या देखील वाढत आहे. याचा विचार करता जिल्ह्यात लवकरात लवकर टेस्ट रिपोर्ट मिळण्यासाठी २ मोबाईल आरटीपीसीआर लॅब डॉक्टर्स, टेक्निशियन व स्टाफ मिळणे आवश्यक आहे. कोरोना आणि म्युकरमायकोसिससाठी आवश्यक असलेली इतर सर्व औषधे यांचा मोठया प्रमाणात पुरवठा करून देणे आवश्यक आहे.

जिह्यात फिजिशियन्स, भूलतज्ज्ञांची कमतरता असून ते तातडीने उपलब्ध होण्यासोबत पॅरामेडीकल स्टाफ तसेच होमिओपॅथीच्या डॉक्टरांना नियुक्तीबाबत जिल्हाधिकाऱ्याना आदेश देण्यात यावेत. जिल्ह्यात फक्त १ लाख २० हजार लोकांनाच आतापर्यंत लसीकरण झालेले आहे. त्यामळे तातडीने लसीचा मुबलक पुरवठा व्हावा. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर टेस्टींग, ट्रेसिंग, कंटेनमेंट झोन याबाबत झोन याबाबत कडक अंमलबजावणी होण्याचे निर्देश द्यावेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीपासून ते सीसीसी सेंटर, रुग्णालये आदी ठिकाणी डाटा अपडेटसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.

जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयापासून सर्व कोविड हॉस्पिटलच्या ठिकाणी बेड व रुग्णांच्या परिस्थिती माहितीसाठी नियंत्रण कक्ष उभारावा. तसेच जिल्ह्याच्या सिमेवर तपासणीसोबतच गावनिहाय सर्वे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना द्यावेत . तरी बरील बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!