हलवळ येथील वळणावर ट्रक पलटी!

हलवळ येथील वळणावर ट्रक पलटी!

*कोकण  Express*

*हलवळ येथील वळणावर ट्रक पलटी!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई - गोवा महामार्गावर हलवळ फाट्या नजिकच्या वळणावर गुजरात ते गोवा ( वेर्णा ) असा कलर वाहतूक करणारा ट्रक पटली झाला. या अपघातात चालक व क्लीनर सुदैवाने बचावले असून दोघेही किरकोळ जखमी झालेत. सदर अपघातग्रस्त ट्रक येथील रस्त्यालगत असलेल्या शितपेय तथा भाजी विक्री स्टॉलला धडक दिल्याने स्टोलचेही नुकसान झाले आहे. तसेच सदर अपघताची घटना आता काहीवेळा पूर्वी ( रा. १० वा.) घडली असून नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना उपतालुका प्रमुख राजू राणे, संकेत नाईक, बंड्या नाईक, अक्षय सावंत, महेंद्र पंडित सिद्धेश सावंत, हितेश मालंडकर, सुयोग ताटे, रोहीत राणे, आदिंनी जखमींना मदत केली. त्यानंतर सदर घटनेची माहीती कणकवली पोलिसांना नागरिकांना दिल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागले, स. उप पो. नि. बापू खरात घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, या धोकादायक वळणावर वारंवार अपघात घडतात. दोन महीना पूर्वी ही अपघात झाला होता. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देवून अपघात टाळण्यासाठी उपाय योजना कराव्यात. अशी मागणी नागरिक करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!