*कोकण Express*
*कणकवली तालुक्यातील भरणी गावातील तांबळवाडी सील…!*
*जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी भरणी गावातील तांबळवाडी परिसराचा घेतला आढावा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भरणी गावातील तांबळवाडी सील करण्यात आली आहे. भरणी गावातील तांबळवाडी मध्ये २९ रुग्ण कोरोना बाधीत सापडले आहेत. त्यामुळे सील करणायत आली आहे. आज सकाळी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामनियंत्रित समितीने बैठक घेऊन हि वाडी सील केली. मागील काही दिवस भरणी या गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने व सरपंच आणि त्या वाडीतील एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याने, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सोमवारी रात्री पाऊणे नऊ वाजता सुमारे एक तास भर भरणी आणि तांबळवाडी परिसराचा आढावा घेतला.
त्यावेळी त्यांनी भरणी तांबळवाडीच्या दोन्ही हद्दी, अंतर्गत वाटा सील करणे, भरणी तांबळवाडी परिसर सॅनिटाइझ करणे, आदी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत ग्राम सनियंत्रण कमिटी भरणी आणि सबंधित यंत्रणांना आदेश दिल्याने आज ही वाडी सील करण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार आर. जी. पवार, मंडळ अधिकारी नायगावकर, वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, बी. डी. ओ. अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी वारंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ, पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक, पं. स. सदस्य गणेश तांबे, पंचायत समिती अधिकारी पवार, प. स. सदस्य गणेश तांबे, उपसरपंच, ग्रामसेवक निर्मल, तलाठी कोरगावकर, पोलीस पाटील ताम्हणकर, अनिल बागवे, अनिकेत गुरव, सुनील तांबे आदी उपस्थित होते.

