नगरसेविका मेघा गांगण यांनी जपली सामाजिक बांधिलकी

नगरसेविका मेघा गांगण यांनी जपली सामाजिक बांधिलकी

*कोकण  Express*

*नगरसेविका मेघा गांगण यांनी जपली सामाजिक बांधिलकी*

*कणकवली नगरपंचायतच्या नगरसेवकांकडूनही दातृत्वाचा हात*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरमध्ये अनेक कोविडचे रुग्ण उपचार घेत असताना या रुग्णांना आवश्यकता भासली तर ऑक्सिजन सिलिंडरसह अन्यही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, या कोविड सेंटरमध्ये असलेल्या चार ऑक्सिजन जंबो सिलिंडरला कनेक्टरची आवश्यकता भासत होती. ती गरज ओळखून कणकवली नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून साज ग्रुपतर्फे दोन सिलिंडर कनेक्टर तर गांगण यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष समीर नलावडे व सत्ताधारी नगरसेवकांच्या वतीने दोन असे एकूण चार कनेक्टर भेट देण्यात आले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी हे कनेक्टर स्वीकारले. यावेळी नगरसेविका सुप्रिया नलावडे, माजी नगरसेवक बंडू गांगण उपस्थित होते. कोविड काळात कणकवली नगरपंचायतच्या सत्ताधारी नगरसेवकांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकी बद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!