*कोकण Express*
◾ *सकाळचे बातमी अपडेट / २५ मे मंगळवार*
◾ व्हॉट्सअॅपने आपल्या नवीन पॉलिसीची मुदत ,19 जून 2021 पर्यंत वाढवली आहे – दरम्यान भारताला व्हाट्सअपच्या, नवीन पॉलिसी मान्य नाहीत
◾ कोरोना झालेल्यांनी कोरोनाच्या काळात – आहारात मीठ, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा – तसेच सिगारेट, अल्कोहोल तसेच मादक पदार्थ पूर्णपणे टाळा.
◾ महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या – राज्यातील 130 रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार होतात – महाराष्ट्र सरकारची माहिती
◾ वरिष्ठानी दिलेल्या माहितीप्रमाणे – खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे – यामध्ये खाद्यतेलावर लावलेला – कर कमी करण्याबाबत विचार होऊ शकतो
◾ तसे तुम्हाला माहिती असे – भारतात आयात केलेल्या पाम तेलावर 17 टक्के – तर सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावर जवळपास 20 टक्के – कृषी सेस आकारला जातो – हा सेस कमी केल्यास खाद्य तेलाच्या किमती कमी होऊ शकतात.
◾ सीबीएसई बारावीच्या परिक्षेसंदर्भात आज महत्वाची केंद्रिय बैठक – राज्याचे शिक्षणमंत्री उपस्थित राहतील – यामध्ये होणारा अंतिम निर्णय आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवू
◾ रशियाची लस स्पुतनिक व्ही चे उत्पादन भारतात सुरू झाले – भारत पॅनेसिया बायोटेक ही लस बनवणार आहे – स्पुतनिक ही लस कोरोनाविरोधात – अधिक परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
◾ राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट , आता ९२ टक्के झाला आहे – तर काल ३६१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे – दरम्यान सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के आहे
◾ 1 जूनपासून गुगल प्रत्येक अकाउंटला केवळ 15 जीबी क्लाउड स्टोरेज मोफत देणार – त्यात गुगलच्या सगळ्या प्रॉडक्ट्समधल्या डेटाचा समावेश असेल
◾ म्हणजे आता एका अकाउंटवरच्या Gmail, Google Docs, Sheets, Drives आणि गुगलच्या अन्य सेवांमध्ये मिळून – एकूण 15 जीबी डेटा मोफत साठवता येईल
◾ म्युकरमायकोसिस हा बुरशी संसर्ग – मात्र लक्षात घ्या , तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणारा आजार नाही – डॉ. गुलेरिया यांची माहिती.