*कोकण Express*
*उपकेंद्र स्तरावर लसीकरण शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष जि प सिंधुदुर्ग संजना सावंत यांनी घेतला लसीकरणाचा आढावा…..*
*कणकवली:-(संजना हळदिवे)*
ग्रामीण भागातील लोकांना लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपस्थित राहावे लागते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर या परिसरातील गावातील लोकांची गर्दी होते. तरी वृद्ध लोकांना प्रवास करावा लागू नये तसेच त्यांना गावच्या गावात लसीकरण करून घेणे शक्य व्हावे याकरिता जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी जिल्ह्यातील 248 उपकेंद्र स्तरावर किंवा गावातील ग्रामपंचायतींमध्ये रोटेशन पद्धतीने लसीकरण उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेच्या सुरवातीच्या टप्प्यात लसीकरणा दरम्यान येणाऱ्या समस्या व लसीकरणाचे एकंदरीत काम काज याची पाहणी करण्यासाठी सोमवार दिनांक २४.०५.२०२१ रोजी कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा आढावा घेतला.
ग्रामपंचायत नरडवे येथील लसीकरण केंद्राची पाहणी केली.यावेळी सरपंच अमिता सावंत, उपसरपंच सुरेश ढवळ, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उपस्थित होते. ग्रामपंचायत नाटळ येथील लसीकरण केंद्रावर सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच दत्तू खरात उपस्थित होते. शिवडाव उपकेंद्र येथील लसीकरण केंद्रावर सरपंच ,उपसरपंच उपस्थित होते. हरकुळ खुर्द उपकेंद्रावर देखील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या पूर्ण लसीकरण मोहीम पहाणी वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पोळ उपस्थित होते.