प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाघेरी येथे आजपासून कोव्हीड लसीकरण सुरू

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाघेरी येथे आजपासून कोव्हीड लसीकरण सुरू

*कोकण Express*

*प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाघेरी येथे आजपासून कोव्हीड लसीकरण सुरू*

*युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी केली होती लसीकरण सुरू करण्याची मागणी*

*कणकवली ः (संजना हळदिवे)*

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाघेरी येथे आज कोव्हीड लसीकरण सुरू करण्यात आले. या लसीकरण उपक्रमाचा शुभारंभ प्रा.आ. आरोग्य उपकेंद्राच्या सीएचओ. श्रीमती अश्विनी घुगे, उपसरपंच अनुजा राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी आरोग्यसेविका ए. ए. धुमाळे, सायली मस्के, आरोग्यसेवक श्री. सामंत, पोलीस पाटील अनंत राणे, तोंडवली गावचे पोलीस पाटील विजय मोरये, सिद्धेश राणे, श्री. मस्के सर, दत्तात्रय राणे, सुहास ठुकरुल, मदतनीस स्वप्नाली राणे, आशासेविका श्रुती राणे व लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक उपस्थित होते.
जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. वाघेरी उपकेंद्रांतर्गत वाघेरी, मठखुर्द, पियाळी, तोंडवली, बावशी ही गावे येतात. सदर गावांपासून कासार्डे प्रा. आ. केंद्र हे १० ते १२ किमी. दूर आहे. सद्यस्थितीत वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांची परवड होत असल्याने या गावांतील सुमारे ९५ ते ९८% लोक लसीकरण्याच्या प्रतिक्षेत असल्याबाबत युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी पालकमंत्री नामदार उदय सामंत, जि. प. सदस्य संजय आग्रे व जि.प. आरोग्य विभागाचे लक्ष वेधले होते.
त्यांच्या या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री महोदयांनी उपकेंद्रांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आजपासून प्रत्यक्षात प्रा. आ. उपकेंद्र वाघेरी येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोव्हीशिल्ड लसीचे उपलब्ध झालेले ६० डोस आज ४५ वर्षावरील नागरिकांना देण्यात आले.
प्रा. आ. उपकेंद्र वाघेरी येथे लसीकरण मोहीम सुरू केल्याने पालकमंत्री उदयजी सामंत, जि. प. सदस्य संजय आग्रे, जि. प. आरोग्य विभाग व उपकेंद्र वाघेरी येथील कर्मचारी यांचे सिद्धेश राणे यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!