भाजपा संवेदनशील कार्यकर्त्यांचा पक्ष, कोकणी जनतेच्या मदतीसाठी सदैव पाठीशी; देवेंद्र फडणवीस

भाजपा संवेदनशील कार्यकर्त्यांचा पक्ष, कोकणी जनतेच्या मदतीसाठी सदैव पाठीशी; देवेंद्र फडणवीस

*कोकण  Express*

*भाजपा संवेदनशील कार्यकर्त्यांचा पक्ष, कोकणी जनतेच्या मदतीसाठी सदैव पाठीशी; देवेंद्र फडणवीस*

*कणकवली ः (संजना हळदिवे)*

जेव्हा जेव्हा समाजावर संकट किंवा आपत्ती येते तेव्हा भारतीय जनता पार्टीच मदतीला धावून येते. तौक्ती चक्रीवादळात माजी मुख्यमंत्री, खा.नारायण राणे यांच्या परिवाराने कोकणी जनतेला मदत केली. विरोधी पक्ष नेते दरेकर, प्रसाद लाड मदतीला धावले.

भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परीने नुकसानग्रस्त जनतेला मदत करत आहे.भाजपा संवेदनशील पक्ष आहे. जेथे अडचण येईल तेथे जनतेसाठी धाव घेत आहे. तर या वादळातील नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी भाजपा कोकणी जनतेच्या पाठीशी कायम राहील असा विश्वास विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

The 5th Pillar फेसबुक पेज व युट्युब चॅनेलवर कोकणातील चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे व्हिडीओ, फोटो पाठवून ते प्रसारित करण्यासाठी लॉन्च करण्यात आले, त्याचा शुभारंभ विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन झाला. यावेळी माधवराव भंडारी, रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष, सोशल मीडिया पदाधिकारी उपस्थित होते.

The 5th Pillar फेसबुक पेज व युट्युब हे नुकसान ग्रस्थ जनतेला आधार ठरेल. जनतेला आपल्या व्यथा मांडण्यास जागा मिळेल. पाचवा स्तंभ म्हणून या सोशल मीडिया काम करेल, आज कोकणात नुकसानीचे पंचनामे नीट होत नाहीत. बोटीचे ४० लाख नुकसान झाले तर १५-२०लाखाचे पंचनामे केले जातात.

शेती बागायतींचे सुद्धा तेच झाले आहे. त्यामुळे प्रत्येक नुकसानग्रस्त आपली माहिती या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवेल असे फडणवीस यांनी सांगितले. राज्यात वर्षाला एक वादळ येते त्यामुळे वातावरणातील बदल लक्षात घेऊन कृषि विषयक लागवडीकडे येथील शकऱ्यांना वळावे लागेल. असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातला गेले कारण तेथे तौक्ती चक्रीवादळाचा केंद्र बिंदू होता. ४५ लोकांचा मृत्यू झाला. मोठे नुकसान झाले. याचा अर्थ महाराष्ट्राला विसरले असा होत नाही. प्रेस नोट जाहीर करून महाराष्ट्र व इतर राज्यांनाही मदत देण्याचे घोषित केले आहे. मुख्यमंत्री फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्येच पाहणीला गेले त्यांनी रायगड, कोल्हापूर, सोलापूर, ची पाहणी केली नाही अशी टीका आम्ही केल्यास चालेल काय असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

The 5th Pillar ही संकल्पना नवा आयाम देणारी आहे.जी आंदोलने महात्मा गांधींनी केली त्यांची सुरवात अशीच होती, आधुनिक युगात ही संकल्पना आहे त्याचा पुढे चांगला उपयोग होईल असे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!