*कोकण Express*
*अनिषा दळवींकडून दोडामार्ग कोविड सेंटरला २ ऑक्सिजन सिलिंडर भेट…*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
येथील कोविड सेंटरला जिल्हा परिषद आरोग्य सभापती अनीषा दळवी यांच्याकडून २ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भेट म्हणून देण्यात आले. तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना चांगली सेवा मिळावी,यासाठी सौ.दळवी यांनी हा निर्णय घेतला आहे.याबाबतची माहीती डाॅ.ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी दिली आहे.दळवींनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबाबत ऐवाळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
