*कोकण Express*
*चक्रीवादळामुळे गढीताम्हणे-सडेवाडी येथील विद्युत पुरवठा खंडीत*
*खंडित असलेला वीज पुरवठा आमदार नितेश राणे यांच्या फोननंतर अर्ध्या तासात सुरू
*देवगड ः प्रतिनिधी*
गढीताम्हणे-सडेवाडी येथील विद्युत पुरवठा खंडित असल्याने पाण्याचे पंपदेखील बंद होते. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची प्रचंड हाल होत होते. पंधराहून अधिक घरांचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने काळोखातच त्या लोकांना राहावे लागत होते. याबाबत अखेर आज शैलेश कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या ही बाब निदर्शनास आणताच राणे यांनी तातडीने त्याची दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर काही वेळातच विद्युत पुरवठा सुरळीत झाला अशी माहिती कदम यांनी दिली. आमदार नितेश राणे यांच्या या तत्परतेबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.