*कोकण Express*
*प्रथमेश सावंत यांच्याहस्ते हरकुळ, नाटळ जि. प. मतदारसंघात पत्र्याचे वाटप…!*
*कणकवली ः (संजना हळदिवे)*
हरकुळ खुर्द येथे शिवसेनेतर्फे पत्रे वाटप करण्यात आले. बाणे यांचे चक्रीवादळामुळे घराचे पूर्ण छप्पर उडून गेले. त्यामुळे तात्काळ शिवसेनेने दखल घेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांच्यातर्फे हरकुळ व नाटळ जि. प मतदारसंघात पत्र्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना हरकुळ विभागप्रमुख बंड्या रासम, विठ्ठल तेली, रुपेश कुबल, ऋषिकेश रासम, मंगेश सावंत, जागृत सावंत, मुन्ना तेली व इतर शिवसैनिक उपस्थित होते.