*कोकण Express*
*जिल्हा रुग्णालयात फिजिशियन नाही परिचारिकांच्या आंदोलनांमुळे वास्तव जनतेसमोर!*
सिंधुदुर्गात कोरोना मृत्यू दर वाढीस पालकमंत्री जबाबदार- राजन तेली…
*सिंधुदुर्ग :-(संजना हळदिवे)*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्ष म्हणून गेले वर्षभर कोरोना कालावधी असल्यामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना नेहमी सहकार्याची भूमिका ठेवली. मात्र या काळात देखील सत्ताधाऱ्यांनी कोरोना वर मात करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम केलेली नाही. जिल्ह्यात पीएम केअर मधून आलेले व्हेंटिलेटर अद्याप जोडलेले नाहीत. जिल्हा रुग्णालयात फिजिशियन नाही, ज्या परिचारिकांनी आंदोलन केलं,त्यामुळेच वास्तव जनतेसमोर आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा पर्दापाश झालेला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात जिल्हाधिकारीयांची भेट घेऊन सगळ्या गोष्टींची माहिती देवू, त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हा प्रशासन व सत्ताधार्यांच्या विरोधात आरोग्य व्यवस्थेसाठी आंदोलन करेल. जिल्ह्यात कोरोना रुग्ण मृत्यू दर वाढीला पालकमंत्री जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.
जिल्हा रुग्णालयात सावळागोंधळ सुरु आहे. दररोज १४ ते १५ लोकांचा मृत्यू कोरोणामुळे होत आहे,याला जबाबदार कोण? खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यामध्ये सत्ताधारी लोकांना अपयश आलेले आहे.केवळ पालकमंत्री, आमदार ,खासदार फोटो काढण्यासाठी चढाओढ करत आहेत. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सातत्याने या विरोधात आवाज उठवत आहोत, तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम सत्ताधारी मंडळींनी केले आहे .दररोज पालकमंत्री खोट्या पत्रकार परिषदा घेऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र मृत्यु दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र संताप आहे.
जनता या सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाही, हे सत्ताधाऱ्यांचा अपयश आहे. जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर,ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. चार चार तास रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात येऊन खाली थांबत आहेत. तालुक्यातून आलेले रुग्ण गंभीर अवस्थेत त्याठिकाणी मृत्युमुखी पडत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ६०० पेक्षा जास्त लोकांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंतादायक आहे.यामुळे जिल्हा हॉस्पिटलच्य कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टी कोणत्याही क्षणी आंदोलन तानाजीचा राजन तेली यांनी दिला आहे.
जिल्हा रुग्णालय व सर्व तालुक्यातील शासकीय रुग्णालयांमधून बाहेरून औषधे आणण्यासाठी चिठ्या दिल्या जातात. कोरोनासाठी आलेला निधी सत्ताधारी कुठे वापरत आहेत?लोकांकडे पैसे नसताना त्यांच्याकडे बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठ्या दिल्या जातात. शासकीय रुग्णालयांमध्ये औषधाचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा, जिल्हा रुग्णालयात फिजिशियन भरण्यात यावा, तसेच परिचारिकांचे प्रश्न, कर्मचाऱ्यांचे प्रश्न,तातडीने सोडवावेत.रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सगळ्या गोष्टी लक्षात आणून दिल्या जातील. त्यानंतर आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील राजन तेली यांनी दिला आहे.
सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आंदोलन परिचारिकांना करावा लागले. हे वास्तव जनतेसमोर आता आलेले आहे,मृत्यूदर वाढलेला आहे.या सगळ्या घटनांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. ज्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ आहे. सत्ताधाऱ्यांनी दिले पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे मागणीचे पत्र देणार असल्याचेही राजन तेली यांनी सांगितले. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्यास चर्चेतून मार्ग निघेल.मात्र पालकमंत्री विरोधकांना विश्वासात घेत नाहीत.केवळ दोन वेळा बैठकांसाठी निमंत्रण दिले, बाकी केवळ स्वतःच आढावा बैठका घेऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही राजन तेली यांनी केला.भारतीय जनता पार्टी केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे. ती भाजपच्या माध्यमातून थोडीफार मदत म्हणून केली जात आहे. मुंबई भाजपच्या माध्यमातून येत्या दोन दिवसात येणारी मदत देखील नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल असेही त्यांनी सांगितले.