*कोकण Express*
*जेल क्वारंटाईन सेंटरमधून आरोपी फरार*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सावंतवाडी आय टी आय येथे तयार करण्यात आलेल्या जेल क्वांरनटाईन सेंटर मधुन आज सकाळी सहाच्या सुमारास एक आरोपी फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. खिडकीला चादर बांधून त्याने पळ काढला आहे. याबाबत जेल प्रशासनाकडून सावंतवाडी पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. यावेळी सावंतवाडीचे जेलर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.