*सकाळचे बातमी अपडेट / २४ मे सोमवार*

*सकाळचे बातमी अपडेट / २४ मे सोमवार*

*कोकण Express*

◾ *सकाळचे बातमी अपडेट / २४ मे सोमवार*

◾ टाटा स्टील कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा केली – कंपनीत कर्तव्यावर असताना ,अनेक कर्मचार्‍यांचे मृत्यू होतात – अशा परिस्थितीत कंपनीने म्हटले आहे की –

◾ आता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे सेवा पूर्ण होईपर्यंत , त्याच्या कुटुंबास संपूर्ण वेतन दिले जाईल – याबरोबरच निवास आणि वैद्यकीय सुविधा देखील देण्यात येईल –

◾ इतकेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार – काल २३ मे ला , टाटा स्टील कंपनीने याबाबतची अधिकृत घोषणा केली

◾ शेतकरी आंदोलनाला 26 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. 6 महिने होऊनही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत –

◾ त्याविरोधात शेतकऱ्यांनी 26 मे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला – . या दिवशी देशभरात आंदोलनं होणार आहेत – याला काँग्रेसह देशातील 12 विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला

◾ देशात ब्लॅक फंगसचे रुग्ण वेगाने वाढत आहेत – यामुळे आतापर्यंत 7000 रुग्णांचा मृत्यू झाला – AIIMS च्या संचालकांनी याबाबतचा अहवाल सादर केला

◾ 12 वीच्या परिक्षेसाठी देशातील अनेक राज्यांची तयारी आहे – दरम्यान 1 जूनला बारावीच्या परिक्षेसंदर्भात शेवटचा निर्णय घेऊ – असे केद्रींय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले

◾ चक्रीवादळाचा धोका असल्याने , 25 तारखेला पुण्यावरून सुटणारी – पुणे हावडा एक्स्प्रेस रद्द केली आहे – त्यामुळे हावडा एक्स्प्रेससाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन , काल मध्य रेल्वेने केले

◾ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून – १० वी परीक्षेबाबत एक-दोन दिवसांत निर्णय घेणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

◾ ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडा कमी असेल – त्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देणार – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!