पँकेजची फसवेगिरी करणे ठाकरेंच्या रक्तात नाही…!- नगरसेवक सुशांत नाईक

पँकेजची फसवेगिरी करणे ठाकरेंच्या रक्तात नाही…!- नगरसेवक सुशांत नाईक

 *कोकण  Express*

*पँकेजची फसवेगिरी करणे ठाकरेंच्या रक्तात नाही…!- नगरसेवक सुशांत नाईक*

*कणकवली ः प्रतिनिधी (संजना हळदिवे)*

उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावे. मग महाराष्ट्रासाठी केंद्रातून मदत आणतो, असे बालिश वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणेंना मी सांगु इच्छितो की विधानसभेत १७० आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. त्यामुळे ११७ आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याची दिवास्वप्ने त्यांनी पाहु नयेत. भविष्यात महाराष्ट्रात कधी भाजपची सत्ता आल्यास राज्यमंत्रीपद किंवा गेला बाजार एखादे मंडळ मिळवायचे असेल तर देवेंद्र फडणवीसांची भलावण केल्याशिवाय पर्याय नाही याची नितेश राणेंना जाणीव झालेली दिसतेय. आपली लाल दिव्याची राजकीय महत्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी बापाच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाची आहुती देणारा नितेश राणे हा जगातला पहिलाच पोरगा असेल. नितेश राणेंनी स्वाभिमान संघटना काढली, त्यांच्या वडीलांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला आणि आज दोघेही पितापुत्र फडणवीसांच्या चरणी स्वाभिमान गहाण टाकुन लाळघोटेपणा करीत आहेत. मुळात स्वाभिमान ही काही सांगायची गोष्ट नसुन तो रक्तातच असावा लागतो. राणे पितापुत्रांच्या रक्तात फक्त पदांसाठी करायची लाचारी आहे. स्वाभिमान या शब्दाशी त्यांचा दूरान्वयेही संबंध नाही. महाराष्ट्राला मदत आणण्यासाठी मुळात या भुमीविषयी मनात नितांत आदर व प्रेम असावे लागते. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी आपल्या निष्ठा गुजराती मोदी-शहाच्या चरणी गहाण ठेवलेल्या असल्यामुळे फडणवीस आणि त्यांचा संपुर्ण कंपु महाराष्ट्रद्रोही असल्याची इथल्या जनतेची खात्री झालेली आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणारे व सत्ता नसल्यामुळे पछाडलेले भाजपचे नेते संकटाच्या व नैसर्गिक आपत्तीच्या काळात किळसवाणे राजकारण करून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाताना राज्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. महाराष्ट्रात सत्ता असेल तरच केंद्राकडून मदत मिळेल हे भाजपचे आमदार नितेश राणेंनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केल्यामुळे ‘नेशन फर्स्ट’चा मुखवटा घालुन फिरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशातील जनतेसमोर आला आहे. पंतप्रधान मोदींसाठी देश प्रथम नसुन ज्याठिकाणी भाजपची सत्ता आहे त्याच राज्यांवर त्यांचे जास्त प्रेम आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांचा ते द्वेष करतात, हे नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र आणि केरळ मध्ये तौक्ते चक्रीवादळाने थैमान घातलेले असताना फक्त भाजपशासित गुजरात राज्याला एक हजार कोटी रुपये मदतीचे आर्थिक पँकेज जाहीर करून पंतप्रधान मोदींनी आपण जाहीरपणे राज्याराज्यात भेदभाव करतो याची पुष्टी दिली आहे. राज्याराज्यात किंवा प्रांताप्रांतात भेदभाव करणार नाही अशा आशयाची शपथ राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना दिलेली असताना मोदींनी गुजरात व इतर राज्यात भेदभाव करून या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे पंतप्रधानपदावर विराजमान राहण्याचा त्यांना संवैधानिकरीत्या अधिकारच उरत नसल्याने नरेंद्र मोदींनीच पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे नैतिकद्रुष्टीने उचित ठरेल.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे आपल्या शब्दाला पक्के आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांप्रमाणे फसव्या पँकेजची घोषणा करणे त्यांच्या स्वभावात नाही. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला निवडणुकीदरम्यान साडे सहा हजार कोटींच्या पँकेजचे गाजर दाखवले होते. निवडणुका संपल्यानंतर त्यातला एक रुपया सुद्धा दिला नाही. नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कँबिनेटची बैठक आयोजित करून कोकणसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या पँकेजची घोषणा केली होती. त्यातील पाचशे कोटी तरी मिळाले आहेत का…? अशी फसवेगिरी करणे ठाकरेंच्या रक्तात नाही. त्यासाठीच चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा पुर्ण आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्यासाठी भरीव आर्थिक मदत जाहीर करणार आहेत. फक्त तेवढ्यावरच न थांबता वादळांपासून जिल्ह्यातील किनारपट्टीवर सुरक्षिततेच्या द्रुष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे कटीबद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!