*कोकण Express*
*१२वी परीक्षेसंदर्भात कुठलाच निर्णय नाही – वर्षा गायकवाड*
बारावीच्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या.
कोरोनामुळे उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीतही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ दिलं जाणार नाही मात्र त्यांची सुरक्षितता महत्वाची असून विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
राज्यात यंदा दहावीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज घेता याबाबतची सरकारची भूमिका न्यायालयासमोर मांडणार आहोत, असं त्या म्हणाल्या. मात्र पुढील वर्षी मुलांचं नुकसान होऊ नये याकरता आतापासूनच नियोजन केलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.