*कोकण Express*
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दत्ता सामंतांचे मदत कार्य सुरूच !*
*जम्बो सिलिंडर आणि दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेकटर कुंभारमाठ कोव्हीड सेंटरला सुपूर्द*
*मालवण ः प्रतिनिधी*
भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांचे कोरोना काळात रुग्णांसाठी मदतसत्र सुरूच आहे. रुग्णांना गोळ्यांचे स्पेशल किट, ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना ऑक्सिमिटर, वाफेचे मशीन दिल्यानंतर रविवारी कुंभारमाठ येथील कोव्हीड सेंटरला एक जम्बो सिलिंडर आणि दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेकटर त्यांनी दिले.
दरम्यान, लाईट नसल्याने भाड्याने घेतलेल्या जनरेटरचं टेंडरही संपत आहे. त्यामुळे जनरेटर घेऊन गेल्यास कोव्हीड सेंटर मधील रुग्णांचे हाल होऊ शकतात. शासनाने परवानगी दिल्यास आपण दर्जेदार जनरेटर कोव्हीड सेंटरला स्वखर्चाने देऊ असे दत्ता सामंत यांनी जाहीर केले.
मालवणसह जिल्हाभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अभावी रुग्ण दगावत आहेत. रूग्णांचे हाल होऊ नयेत, ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी उद्योजक तथा भाजप नेते दत्ता सामंत पुढे सरसावले आहेत. गेले अनेक दिवस दत्ता सामंत यांनी सेवेत वाहून घेतले आहे. औषधोपचार सुरू असलेल्या रुग्णांपर्यंत थेट पोहचून त्यांना धीर देण्याचे व त्यांना बळ देण्याचे काम सामंत करत आहेत.
ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी एक जम्बो सिलेंडर आणि दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेकटर मशीन दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून उपल्बध केले आहेत. कुंभारमाठ येथील कोव्हीड सेंटरला हे साहित्य अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. यावेळी नगरसेवक दीपक पाटकर, भाई मांजरेकर, मंदार लुडबे, बाळा सामंत, बाबू धुरी, डॉ. कपिल मेस्त्री, यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सर्वपक्षीयांनी एकत्र यावे
कोरोनाच्या या महामारीत सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपले हेवेदावे बाजूला ठेऊन एकत्र येणे गरजेचे आहे. एक कमिटी स्थापन करून प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात कोव्हीड सेंटरची उभारणी किंवा रुग्णांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. जर काही व्यक्तींमध्ये लक्षणं दिसत असल्यास त्यांची तात्काळ कोव्हीड टेस्ट होणे गरजेचे आहे. जर समिती मार्फत प्रत्येक वाडीत स्वयंसेवक नेमून अशा प्रकारे काम केल्यास कोरोनाचा वाढता प्रसार थांबवू शकतो. त्यामुळे सर्व पक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहन सामंत यांनी केले आहे.
….तर मी देतो जनरेटर
तौक्ते चक्रीवादळामुळे सर्वत्र वीज पुरवठा खंडित झाला आहे. कोव्हीड सेंटर येथेही वीज नसल्याने रुग्णांना अडचण होत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या वतीजे जनरेटर बसविण्यात आला. मात्र, जनरेटर ज्या कालावधीसाठी घेतला आहे, तो कालावधी संपत आहे. त्यामुळे जनरेटर धारकाने जनरेटर घेऊन गेल्यास पुन्हा रुग्णांची अडचण होऊ शकते. जर प्रशासनाने मला परवानगी दिल्यास मी स्वखर्चाने दर्जेदार जनरेटर उपलब्ध करू असेही दत्ता सामंत यांनी जाहीर केले.