*कोकण Express*
*महिला शेतकऱ्यांना आमदार नितेश राणे यांच्या मार्फत मोफत भात बियाणे उपलब्ध..*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
सडुरे येथील महिला शेतकऱ्यांना आमदार नितेश राणे यांच्या मार्फत मोफत भात बियाणे उपलब्ध झाले आहे. संकटात मदतीचा हात दिल्याबद्दल उपस्थित महिला शेतकऱ्यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले. लाँकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्यातच चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडुन काढले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग व शेतकरी संघामार्फत बाजार भावाने गावागावात भात बियाणे वाटप सुरू आहे. वैभववाडी दौऱ्यावर असलेल्या आमदार नितेश राणे यांनी कृषी अधिकारी यांच्या कडून या उपक्रमाची माहिती घेतली. सडुरे येथे भात बी खरेदीसाठी आलेल्या आठ महिला शेतकऱ्यांचे भात बी चे पैसे आ. राणे यांनी स्वतः देत मदत केली. आमदारांनी मदत करताच त्या महिलांच्या डोळ्यातून पाणी आले. सर्व महिलांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.
आमदार नितेश राणे यांनी सदर बियाणे बाजारभावाने न देता ना नफा ना तोटा या उद्देशाने वितरित करा अशा सूचना कृषी अधिकारी श्री कांबळे यांना दिल्या. यावेळी भाजपा पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.