*कोकण Express*
*इन्सुली येथे गोवा बनावटीची दारू जप्त*
*टेंपोसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त;उत्पादन शुल्कची शनिवारी रात्री कारवाई*
*बांदा ः प्रतिनिधी*
राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल रात्री इन्सुली तपासणी नाक्यावर अनधिकृरित्या वाहतूक केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू जप्त केली आहे. या कारवाईत एका टेंपोसह १७,९८,००० एवढ्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोव्यातून कुडाळच्या दिशेने ही वाहतूक केली जात होती. या कारवाईत दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पो सह एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सिंधुदुर्ग श्री. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शेलेंद्र चव्हाण, रमेश चंदुरे, शरद साळुंखे, संदीप कदम, शिवशंकर मुपडे यांनी केली आहे. या गुन्हाचा पुढील तपास निरीक्षक शेलेंद्र चव्हाण करत आहेत.