*कोकण Express*
*सकाळचे बातमी अपडेट / २३ मे रविवार*
◾ लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीची चाचणी नागपुरात सुरु होणार – यामध्ये २ ते १८ वयोगटातील १७५ मुले सहभागी होत आहेत
◾ कोरोना प्रादुर्भाव असल्याने – देशात बोर्डाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी की नाही – याबाबत आज रविवार २३ मे ला –
◾ केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे शिक्षणमंत्री – तसेच शिक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे –
◾ यामध्ये दहावी बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा होणार आहे – तसे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवू
◾ म्युकरमायकोसिस हा रोग संसर्गजन्य नाही , तसेच तो हवेतून पसरत नाही – टास्क फोर्समधील डॉ. तात्याराव लहाने यनाची माहिती
◾ पेटीएम पेमेंट बँकेतील क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचा – बँकिंग सपोर्ट बंद करण्याचा निर्णय पेटीएमने घेतला – आतापर्यंत क्रिप्टोकरन्सी एक्सजेंच व्यवहारांसाठी पेटीएमचा वापर होत होता
◾ कोरोनातून बरे झालेल्या 96 टक्के रुग्णांच्या शरीरामध्ये – एक वर्षानंतरही अँटिबॉडी राहत आहेत जपानच्या योकोगामा सिटी यूनिव्हर्सिटीची माहिती
◾ हवामानात बदल होत आहेत – पुढील काही दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील – काही भागांत पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी बरसणार – असे हवामान विभागानी सांगितले
◾ NEFT सेवा आज २३ मे ला – १४ तास बंद राहणार – आज सर्व बँकेच्या ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करताना जाणवतील.

