*कोकण Express*
*नितेश राणे यांनी अधिकार्यांना घेतले फैलावर*
वैभववाडी तालुक्यातील विविध गावात जाऊन आ. नितेश राणे यांनी नुकसानीची पाहणी केली. खोरीतील गावामधील काही घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु पंचनामा यादीत रकमा दहा हजार, वीस हजार अशा आहेत. त्याचबरोबर काही आकडेवारी तर पाचशे व सातशे रुपये इतकी नगण्य आहे. आकडे पाहून आमदार नितेश राणे यांनी अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले. नुकसानीच्या सुधारित याद्या सादर करा. अशा सूचना तहसीलदार झळके, गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांना आ. नितेश राणे यांनी दिल्या आहेत.
